Ad will apear here
Next
ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग
भारतातील अनेकविध जाती, धर्म यांना एकत्र बांधून भाषा, वंश, धर्म, लिंगविरहित समान अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केले आहे. प्राचीन काळातील वेदाज्ञेची जागा राज्यघटनेने घेतली आहे. सर्व वेदांचे मूळ असणारा ऋग्वेद व त्यातील ज्ञान वाचकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न अॅड. शंकर निकम यांनी ‘ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग’मधून केला आहे.

प्रत्येक भारतीयाला निरपेक्ष पद्धतीने राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी ऋग्वेदाचा मागोवा घेतल्याचे लेखक सांगतात. यात सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या वेदांची रचना या सर्वांचा उगमकर्ता असलेल्या ऋग्वेदाची निर्मिती, एकूण दहा विभागात विभागलेल्या या महाग्रंथात ३९१ ते ४०३ ऋषींच्या रचना, रचनाकार १५५ ऋषींची थोडक्यात माहिती, ऋग्वेदातील ऋचा, सुक्तांमधील महत्त्वाचे विचार, त्यातील देवताविश्व, आताच्या परिस्थितीत उपयुक्त ठरणारी ऋग्वेदातील मार्गदर्शक बांधणी, वेदाभ्यासासाठी पूरक सहा शास्त्रे, ऋग्वेदातील ‘असूर’ या शब्दाची उकल, त्याचा अर्थ यातून उलगडला आहे. ऋग्वेद व अवेस्ता ग्रंथातील साम्यस्थळेही दाखवून दिली आहेत.  
      
प्रकाशन : ओमकार प्रकाशन
पृष्ठे : ३१७
मूल्य : ३३० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUVBU
Similar Posts
विसाव्या शतकातील मातंग समाज भारतीय समाजरचना ही जाती व्यवस्थेवर अवलंबून आहे. यात देशातील सर्व राज्यांत विविध नावाने अस्तित्वात असलेला मातंग हा एकमात्र समूह आहे, अशी माहिती देऊन प्रा. सोमनाथ डी. कदम यांनी ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’मधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक परिवर्तनाला सामोरे गेलेल्या मातंग समाजाचा इतिहास कथन केला आहे
मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती ‘शिस्त म्हणजे दबाव किंवा नियंत्रण नव्हे’, ‘तरुण मन ताजं असतं. काळाची बाधा त्याला होत नाही’, ‘नातं म्हणजे जीवन आहे’, ‘भय आणि सुख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भयरहित व्हायचं असेल, तर सुखावेगळं व्हावं लागेल’, ‘आपण आणि ही निरर्थकता वेगळी नाही. मी आणि ‘कुणी नाहीची पोकळी’ एकत्र आहे’, जे. कृष्णमूर्ती यांची
परिवर्तन तुमच्याच हाती... भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी अजूनही गरिबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेतच. अशा स्थितीत पिडीत, मागासलेला समाज सुधारावा व प्रचलित व्यवस्थेपासून देशाची मुक्तता व्हावी, या हेतूने इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती...’ या पुस्तकात विचार व्यक्त केले आहेत. जगातील दोन
वाटा आपल्या संस्कृतीच्या आपली संस्कृती ही देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. धर्म, इतिहास, भाषा, आयुर्वेद, सण, उत्सव, संस्कार, खगोल अशी सर्व शास्त्रे संस्कृतीत येऊन एकरूप होतात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी या पुस्तकात आपल्या संस्कृतीविषयक अनेक गोष्टी सोप्या आणि रोचक भाषेत सांगितल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language